महाराष्ट्र

ब्रेकिंग! जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवारांच्या पक्षाचा हात

  • मंत्री जयकुमार गोरे आरोप प्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कादायक माहिती सभागृहात उघड केली आहे. गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या आरोपींचे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी फोन कॉल केले असल्याची धक्कादायक माहिती फडणवीस यांनी दिली. आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले असून यात सगळे लोक शरद पवार गटाचे असल्याचे फडणवीस यांनी सभागृहाला सांगितले.
  • फडणवीस यांनी आज गृह विभागाच्या चर्चेला उत्तर देताना हा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस यांनी म्हटले की, आरोपीने जो कट रचला त्यांचे पुरावे सापडले आहेत. यात सगळे लोक शरद पवार गटाचे लोक आहेत. प्रभाकरराव देशमुख, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स आहेत. त्यांनी अटकेत असलेला पत्रकार तुषार खरात यांना कॉल केले आहेत आणि नंतर त्याने व्हिडिओ करून यांना पाठविले आहेत. या सर्वांची चौकशी होणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
  • गोरे यांच्या प्रकरणात तीन तक्रारी झाल्या. हे सगळं नेक्सस होते. तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्युबर आहे. गोरेंनी पहिली तक्रार केली. विराज रतनसिंह शिंदे यांनी दुसरी तक्रार केली आणि त्यानंतर तिसरी उमेश मोहिते यांनी तक्रार केली. हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील ही महिला असल्याचा बनाव करण्यात आला.
  • याप्रकरणी एक चौथी एक तक्रार झाली. त्यातील तीन लोकांना अटक झाली. पहिली महिला, दुसरा रिपोर्टर आणि तिसरा अनिल सुभेदार आहे. या सगळ्यांनी रचलेला कट उघड झाला आहे. व्हॉट्सॲप मेसेज समोर आले आहेत. शेकडो फोन सापडले आहेत. या सर्वांसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोक सापडले असून आपण हे पुराव्यानिशी सांगत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख हे तिन्ही आरोपींसोबत बोलले असल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले.

Related Articles

Back to top button