बिजनेस

खुशखबर! इलेक्ट्रिक लुना लाँच

कायनेटिक ग्रीनने आपली इलेक्ट्रिक मोपेड भारतात लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे. 80-90 च्या दशकामध्ये लोकप्रिय असलेली कायनेटिक लुना इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच होणार आहे. या गाडीला कंपनीने ‘ई-लुना’  असे नाव दिले आहे.
आता लुना टू-व्हिलर इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये पुन्हा एकदा भेटीला येणार आहे. गाडीचे प्री- बुकिंग सुरू झाले आहे. विशेष म्हणजे फक्त पाचशे रुपये भरून ही गाडी बुक करता येत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ही बुकिंग प्रक्रिया सुरू आहे. बुकिंगसाठी ग्राहकाचे नाव, मोबाईल क्रमांक, ई-मेल आणि निवासी पत्ता इत्यादी तपशील गरजेचे आहेत.
कंपनीने ई-लुनाच्या लाँचिंगची घोषणा केली असली तरी अद्याप तिचे तपशील जाहीर केलेले नाहीत. या गाडीची रेंज 70 ते 75 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. गाडीत 2kWh क्षमतेची बॅटरी असेल आणि गाडीचा टॉप स्पीड ताशी 60 किलोमीटर असू शकतो. दरम्यान कायनेटिक ई-लुनाची किंमत अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

Related Articles

Back to top button