सोलापूर

सोलापुरात खंडणीचा प्रकार

सोलापूर (प्रतिनिधी) लिफ्ट न देण्याच्या कारणावरून तरूणास मारहाण करून १० हजाराची खंडणी मागणाऱ्या तिघांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजर रतन चौधरी (वर 26, रा. रोहिणी नगर भाग 1, जुळे सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून आकाश पवार, पवन पवार, दर्शन चव्हाण (रा. नेहरू नगर, विजापूर रोड) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.9 फेब्रुवारी  रोजी  मध्यरात्रीच्या सुमारास विजापूर रोडवरील जिगजिनी पेट्रोल पंप रेथे तसेच 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अजर चौधरी हा नेहरू नगर येथील कमानीजवळ मित्राची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी आकाश पवार व याचे साथीदार आले. यांनी अजर यास तसेच त्याचे मित्र रशवंत, प्रकाश खांडेकर यांना लिफ्ट न देण्याच्या कारणावरून शिवीगाळ करून हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून आत्ताच्या आत्ता 10 हजार रुपरे दे नाही तर तुला खल्लास करतो आणि पोलिसांत तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. म्हणून विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक गारकवाड पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Back to top button