महाराष्ट्र

दलाल मित्रांनी डाव साधला, धनंजय मुंडेंना उद्धवस्त केले, मी त्यांना…

  • धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर हे जे दलाल लोक आहेत. ते आमच्या घरात थेट स्लीपर घालून येत होते. आज या लोकांकडे अडीच-अडीच हजार कोटींची प्रॉपर्टी आहे. पण आज मी ज्या घरात राहत आहे, त्या घरावर कर्ज आहे. या कर्जाचे हप्ते सुद्धा भरले जात नाहीत. माझ्या मुलाच्या नावावर एकही गाडी नाही. मुंडेंना वाईट गोष्टींचे व्यसन लावून हे दलाल लोक मोठे झाले. आज मुंडेंचे भवितव्य पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. मला ज्याची भीती वाटत होती ते आज झाले आहे, अशा शब्दांत करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंबद्दलच्या इतिहासातल्या गोष्टी समोर आणल्या. 
  • 29 डिसेंबर 1996 पहिल्यांदा आमची भेट झाली. त्यादिवसापासून 2021 पर्यंत खूप आमच्यात खूप वादविवाद झाले. त्यांची फॅमिली, माझी फॅमिली आणि आम्ही दोघांमध्ये खूप वाद झाले. अगोदर पण तीन वेळा त्यांनी मला सोडून दिले होते. तरीपण ते स्वतः आले. मी गेले नाही आणि त्यावेळी तो मी वाद काय केला नाही. मी शांत होते. पुढे धनंजय मुंडे हे मंत्री झाल्यानंतर असे खूप काही लोक आमच्या घरामध्ये येत होते त्यांचे मित्र म्हणून मित्र कशाचे ते तर दलाल होते. राज घनवट, तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे या लोकांनी माझ्या नवऱ्याला वाईट सवय लावली. या गोष्टींचा मला अंदाज होता. मी त्यांना सावध सुद्धा करत होते, असेही करुणा मुंडे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button