महाराष्ट्र
ब्रेकिंग! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ट्विस्ट

- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली. या प्रकरणातील सीआयडीचे अधिकारी अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आता त्यांच्या जागी किरण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता सीआयडीचे पाटील हे करतील. गुजर यांच्याकडील तपास आता पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मकोका कायद्यांतर्गत कारवाई झाल्यास त्या प्रकरणाचा तपास डीवायएसपी रॅंकच्या अधिकाऱ्याकडे सोपविण्यात येतो. आतापर्यंत या प्रकरणाचा तपास करणारे गुजर हे पोलिस निरीक्षक रॅंकचे अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडील तपास डीवायएसपी अर्थात उपअधिक्षक रॅंक असलेल्या पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.



