क्राईम

राज्यात भानामती आणि काळी जादू!

राज्यात सध्या अघोरी पूजेची चर्चेत आली आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून भानामती आणि काळी जादूचे अनेक प्रकार सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान राज्यात एक विचित्र घटना घडली आहे. पुरुष आणि महिलेकडून स्मशानभूमीत नग्न पूजा करण्यात आली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील उदगावमध्ये हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जयसिंगपूर येथील एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या वृद्ध व्यक्तीच्या पार्थिवावर उदगावातील वैकुंठधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर वृद्ध व्यक्तीचे नातेवाईक रक्षा विसर्जनाच्या दिवशी वैकुंठधाम या ठिकाणी गेले होते. त्यावेळी नातेवाईकांना अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी रक्षा बाजूला करून तिथे काळी बाहुली, नारळ आणि नावाची चिठ्ठी लिहून पूजा-अर्चा करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे नातेवाईकांनी उदगाव ग्रामपंचायतीकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर आणखीनच खळबळजनक प्रकार दिसून आला.

या सीसीटीव्हीमध्ये दिसून आले की, गावातील स्मशानभूमी वैकुंठधाममध्ये अघोरी कृत्य होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरुष आणि महिला भरदिवसा नग्न होऊन करणी, भानामतीचे प्रकार करताना दिसत आहेत. 

हे सर्व प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. एक महिला नग्न होऊन करणी आणि भानामतीचा प्रकार करत आहे, तर सहा महिन्यांपूर्वीच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक पुरुष नग्न होऊन अशाच प्रकारची पूजा करत आहे.

पुरुष आणि महिला वेगवेगळ्या वेळी वैकुंठधाममध्ये दिसून आले आहेत. अमावस्या, पौर्णिमा, शनिवार आणि बुधवार या दिवशी भरदिवसा ही अघोरी पूजा होत होती. या प्रकारामुळे उदगाव आणि जयसिंगपूर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही.

Related Articles

Back to top button