क्राईम

सात वर्षांचे प्रेमसंबंध, सुमनच्या ‘त्या’ मागणीला प्रियकर पठाण कंटाळला

  • राज्यात एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा क्रूरपणे खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
  • सांगली-कोल्हापूर रोडवरील रूकडी फाटा परिसरातल्या सागरिका लॉजवर ही भयानक घटना घडली आहे. 
  • सुमन सुरेश सरगर (मृत महिला) असे मृत प्रेयसीचे नाव असून तिचा खून करणाऱ्या प्रियकराचे नाव आदमगौस पठाण आहे. 
  • सुमन आणि पठाण हे दोघेही रुकडी येथील सागरिका लॉजवर गेले होते. दोघांमध्ये काही वेळानंतर आर्थिक कारणावरून वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, संतप्त झालेल्या पठाणने हातोड्याने सुमनच्या डोक्यावर आणि शरीरावर सपासप वार करत तिचा जागीच खून केला. ही हत्या इतकी क्रूर होती की, लॉजच्या कर्मचाऱ्यांनी रक्ताच्या थारोळ्यात सुमनचा मृतदेह पाहून पोलीस ठाण्यात धाव घेतली.
  • दरम्यान या प्रकरणात सर्वात भयावह बाब म्हणजे पठाण हा आधीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आरोपी आहे. त्याने काही वर्षांपूर्वी स्वतःच्या पत्नीची देखील हत्या केली होती. त्या गुन्ह्यातून शिक्षा भोगून तो बाहेर आल्यानंतर त्याचे सुमन हिच्याशी प्रेमसंबंध जुळले. या नात्याचा शेवटही त्याने तितक्याच अमानुष पद्धतीने केला. सुमनला लॉजमध्ये नेऊन कोणतीही दया न दाखवता, केवळ आर्थिक वादावरून तिचा प्राण घेतला. या घटनेनंतर पठाण फरार झाला आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. 

Related Articles

Back to top button