- मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर, सरकार उलथवून टाकण्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. तसेच आंदोलनाचे एकूण सात टप्पे असतील असे सांगत आरक्षणाचा कंडका कोणत्या टप्प्यात पडणार यावर तसेच राज्य सरकार मी नाही तर, पंतप्रधान मोदी आणि शहा हेच उलथवून टाकतील, असे जरांगेंनी म्हटले आहे. जुन्नरमधून मुंबईकडे रवाना होताना जरांगेंनी वरील भूमिका स्पष्ट केली आहे.
- आरक्षण मिळाले नाही तर, सरकार कसे उलथवून टाकणार? असे जरांगेंना विचारले असता ते म्हणाले की, आरक्षणाच्या प्रश्नावरून पंतप्रधान मोदी आणि शहा साहेबांना एवढा डाग लागत असेल तर, ते बरोबर सरकार उलथवून लावतील.
- जरांगेंनी आरक्षणासाठी आंदोलनाचे सात टप्पे असतील असे सांगितले आहे. त्यावर आंदोलनाचा कंडाका कधी पडणार आणि आरक्षणाचा करेक्ट कार्यक्रम होणार असे विचारले असता जरांगे म्हणाले की, आणखीनही फडणवीसांच्या हातातून संधी गेलेली नसून त्यांनी गोरगरिबांच्या लेकरांना न्याय देण्याचे काम कारावे. आम्हाला जेलमध्ये टाकण्याच्या आणि गोळ्या घालण्याचा भानगडीत राहू नका, असेही जरांगेंनी स्पष्ट केले.
ब्रेकिंग! मनोज जरांगेंचे आंदोलन नव्या वळणावर
