महाराष्ट्र

ब्रेकिंग! मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

  • राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी वाढल्याचे बघायला मिळाले. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.
  • दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.
  • दरम्यान मुंबईत हवामान विभागाकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. त्याशिवाय अनेक रेल्वे ट्रॅकवर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील दुसऱ्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून सकाळच्या सत्रात शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप घरी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • शाळांबरोबर महाविद्यालयांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रातील मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या मुंबईत भर दिवसा अंधाराचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Related Articles

Back to top button