खेळ
18 वर्ष वाट पहायला लावलीस मित्रा

- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे हा क्षण केवळ संघासाठीच नाही, तर बंगळुरूच्या चाहत्यांसाठीही खूप भावनिक होता. ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहलीचे डोळे पाणावले होते. त्याला 17 वर्षांपासून वाट पाहत असलेला आनंदही मिळाला. अखेर बंगळुरूने आयपीएल ट्रॉफी जिंकली. अशा परिस्थितीत या सेलिब्रेशनचे फोटो देखील चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहणार आहेत.
- बंगळुरूने 17 वर्षांनी आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. यादरम्यान विराट भावुक झाला आणि मैदानावर रडू लागला. यानंतर त्याने पत्नी अनुष्का शर्माला मिठी मारली. सामना संपण्यापूर्वीच विराटच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 20 व्या षटकात विराट भावुक झाला आणि रडू लागला. यानंतर सामना जिंकल्यानंतर संपूर्ण संघाने विराटला मिठी मारली.
- कालच्या विजयानंतर विराटने आज सकाळी सोशल मीडियावर पहिली पोस्ट शेअर केली आहे, त्यामध्ये त्याने मैदानावरील ट्रॉफी उचलतानाचे आणि ट्रॉफीबरोबर शूट केलेले काही फोटोही टाकले आहेत. तसेच त्याने एक भावूक पोस्टही लिहिली आहे.
- आयपीएल ट्रॉफीबद्दल मी काय बोलू…, मित्रा, ही ट्रॉफी उचलून आनंद साजरा करण्यासाठी मला तू 18 वर्षं वाट पाहायला लावलीस. पण या प्रतिक्षेनंतरचा आजचा आनंद अनोखा आहे, असे म्हणत विराटने या कॅप्शनला शेवटी हार्ट, ट्रॉफीची इमोजी टाकली आहे.



