- राज्यात लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. या योजनेचा उद्देश 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना दरमहा दीड हजार रुपये मदत करण्याचा होता.
- मात्र, अनेक अपात्र व्यक्तींनी नियमबाह्य पद्धतीने या योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले असून आता राज्य सरकार अशा लाभार्थींकडून पैसे वसूल करण्याच्या तयारीत आहे. राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत कठोर भूमिका जाहीर केली आहे.
- ही योजना गरजू आणि गरीब महिलांना मदत करण्यासाठी सुरू केली होती. या योजनेतील त्रुटी जसजशा लक्षात येत आहेत, तसतशी अपात्र नावे वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुरुषांनी या योजनेचा लाभ घेण्याचे कोणतेही कारण नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
लाडकी बहीण योजनेबाबत अजितदादांकडून मोठी अपडेट
