राजकीय

ब्रेकिंग! शरद पवारांचा नवा डाव

अलीकडे झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. राजकीय पक्षांनी त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू केली आहे. दरम्यान, आता भाजपला टेन्शन देणारी बातमी आली आहे.  ज्येष्ठ नेते शरद पवारांनी मोठा डाव टाकला असून इंदापूरप्रमाणेच साताऱ्यातही मोठा नेता तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी साताऱ्यातील भाजपा नेते मदन भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसऱ्या पक्षातील नेते फोडून आपला पक्ष वाढविणाऱ्या भाजपाला आता पवारांच्या राष्ट्रवादीकडून जशास तसे उत्तर मिळू लागले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाटील आज सकाळी भोसले यांच्या घरी गेले होते. या भेटीत त्यांनी पवार गटात या, असा प्रस्ताव भोसलेंसमोर मांडला असावा, अशी शक्यता आहे. पण याबाबत खात्रीशीर माहिती नाही. मात्र तरीही अशी शक्यता जर प्रत्यक्षात आली तर वाई मतदारसंघातील राजकीय गणिते निश्चितच बदलणार आहेत. याचा भाजपाला मोठा फटका बसण्याचीही शक्यता आहे.
या भेटीनंतर पाटील हसतहसत बाहेर पडले. या भेटीत काय चर्चा झाली, याची माहिती देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. भाजपामधील सर्वच जण माझे मित्र आहेत, अशी त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली आणि निघून गेले. दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला धक्के देण्याची रणनीती शरद पवार गटाने आखल्याचे दिसत आहे.

कोल्हापुरातील समरजितसिंह घाटगे पवार गटात प्रवेश घेतील, हे आता निश्चित आहे. तसेच इंदापुरातही हर्षवर्धन पाटील यांची चर्चा सुरू झाली आहे. तेही तुतारी फुंकतील, असे सांगितले जात आहे. अजितदादा पवार गटाचे आमदार अतुल बेनके यांनीही शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे अजितदादा यांचे टेन्शन वाढले आहे.

Related Articles

Back to top button