ब्रेकिंग! संजय दत्तच्या एका चुकीमुळेच मुंबईत बॉम्बस्फोटाचे धमाके

Admin
1 Min Read
  • १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांना थांबवता आले असते जर अभिनेता संजय दत्त याने ज्या कारमधून एके-४७ बंदूक उचलली होती, त्या कारबद्दल पोलिसांना सांगितले असते तर हे स्फोट कधीच झाले नसते, असे विधान ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी केले आहे. संजय दत्तकडे एके-४७ होती, मात्र त्याने कधीही ती बंदूक चालवली नाही, असेही निकम यांनी म्हटले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत निकम बोलत होते.
  • उज्ज्वल निकम म्हणाले, बॉम्बस्फोटांच्या काही दिवस आधी दाऊद इब्राहिमसाठी काम करणारा अबू सालेम हा शस्त्रांनी भरलेली व्हॅन घेऊन संजय दत्तच्या घरी आला होता. त्यात हँडग्रेनेड आणि एके-४७ होती. संजय दत्तने त्यातून काही वस्तू घेतल्या आणि नंतर त्या परत केल्या. पण, एके-४७ स्वत:कडे ठेवून घेतली. याबद्दल पोलिसांनी माहिती न देणे हे स्फोटांचे कारण बनले. ज्यात लोक मृत्यूमुखी पडले.
  • संजय दत्त निर्दोष होता, त्याला शस्त्रांची आवड असल्यानेच बंदूक ठेवली होती. कायद्याच्या दृष्टीने त्याने गुन्हा केला, पण तो एक साधा माणूस आहे. संजय दत्तकडे एके-४७ होती मात्र त्याने कधीही बंदूक चालवली नाही. परंतु, पोलिसांना त्याबद्दल माहिती न देणे हेच इतक्या लोकांच्या मृत्यूचे कारण होते, असे निकम यांनी सांगितले.
Share This Article