क्राईम

लेकीच्या संसारात सासू करायची लुडबुड

  • पती आणि पत्नीच्या संसारात पतीची सासू सतत लुडबुड करायची. जावई आपल्या सासूला वैतागला होता. दोघांच्या संसारात सासूचे लुडबुडणे दिवसेंदिवस वाढू लागले होते. याच रागातून पतीने दोन साथीदारांच्या मदतीने आपल्या सासूचा खून केला. त्यानंतर तिचे तुकडे तुकडे केले आणि परिसरात फेकून दिले. ही घटना कर्नाटकातील तमुकुरु जिल्ह्यातील कोरटगेरे येथील आहे. दरम्यान, जावई हा पेशाने दातांच्या उपचारांचा डॉक्टर असल्याचे तपासातून समोर आले आहे. आरोपी डॉक्टरचे नाव रामचंद्र असे आहे. तर त्यांच्यासोबत असलेले सतीश आणि किरण यांना पोलिसांनी अटक केली आहे.
  • तमुकुरु पोलीस ठाण्याचे अधीक्षक अशोक केवी यांनी या प्रकरणाचा खुलासा केला असता ही घटना 7 ऑगस्ट रोजी कोरटेगेरे पोलीस ठाण्यांतर्गत घडली आहे. हे प्रकरण ऐकून पोलिसही हादरून गेले आहेत. जावयाने आपल्या सासूला दोघांच्या मदतीने खून केला आणि नंतर तिचे तुकडे घटनास्थळावरील परिसरात इकडे तिकडे फेकून दिले.
  • पोलिसांनी संबंधित प्रकरणाचा तपास केला आणि गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी सासू बेपत्ता झाल्याप्रकरणी शोध सुरु केला. त्यानंतर हे प्रकरण समोर आले. तपासादरम्यान, पोलिसांना सासूच्या मृतदेहाचे तुकडे ठिकठिकाणी विखुरलेले दिसू लागले होते. हे सर्व चित्र पाहून पोलिसही भयभीत झाले होते. या प्रकरणातून खून करण्यात आलेल्या सासूचे नाव लक्ष्मीदेवी असल्याचे समोर आले आहे.

Related Articles

Back to top button