महाराष्ट्र
ब्रेकिंग! पाऊस वैरी बनून कोसळतोय

- जून महिन्यात हजेरी लावणाऱ्या मान्सूनने यंदा 12 दिवस आधीच हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याची घोषणा हवामान खात्याकडून रविवारी करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान लातूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांपासून सततच्या मुसळधार पावसाने नदी-नाले तुडुंब भरले असून, मांजरा, तेरणा, तावरजा आणि रेणा नद्यांच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अहमदपूर तालुक्यातील गोताळा येथे सोमवारी दुपारी पावसापासून वाचण्यासाठी झाडाखाली थांबलेल्या आठ शेतमजुरांवर वीज कोसळली.
- यात विक्रम कारले आणि रंजनबाई समुखराव यांचा जागीच मृत्यू झाला तर उर्वरित सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने अहमदपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, पुढील उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. अहमदपूरचे आमदार आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.



