सोलापूर
सोलापुरात खळबळ! नामांकित शाळेत 56 वर्षीय शिक्षकाकडून दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग

- सोलापूरमध्ये गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 56 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला आहे. या कृत्यानंतर शिक्षकाने कोणाला काहीही न सांगण्याची विद्यार्थिनीला धमकी दिली होती. ही घटना 19 एप्रिल ते 3 जुलै रोजी शाळेच्या पार्किंगमध्ये घडली होती. भीतीपोटी अल्पवयीन विद्यार्थ्यिनीने कुठेही तक्रार दाखल केली नाही. तुला काहीच कळत नाही, तू काही कामाची नाहीस, दहावीत असूनही तुझ्यात काहीच बुद्धी नाही, अशा शब्दांत आरोपी शिक्षक पीडित विद्यार्थिनीला वारंवार अपमानित करत होता.
- संबंधित प्रकरणात खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती मिळाली असता नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोक्सो अंतर्गत विविध कलमान्वये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.



