महाराष्ट्र

शरद पवारांनी रंग दाखवलाच

  • पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर जेष्ठ नेते शरद पवारांनी एक वक्तव्य केले आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या हल्लानंतर देशात संतापाची लाट आहे. धर्म कोणता असे विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असे सांगितले जात आहे. असे असताना पवारांनी मात्र थोडं वेगळं वक्तव्य केले आहे. हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या याबाबत आपल्याकडे काही माहिती नाही, असे ते म्हणाले. पण त्यांनी महिलांना सोडले असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 
  • हिंदू आहेत म्हणून गोळ्या घातल्या, याबाबत काय सत्य आहे हे मला माहिती नाही. पण तिथं जी लोक होती, त्यातील स्त्रियांना सोडले असे दिसत आहे. मी एका बहीणीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले, आम्हा महिलांना त्यांनी हात लावले नाहीत. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला, असे पवार म्हणाले. सध्या ते सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत. त्या वेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. 

Related Articles

Back to top button