महाराष्ट्र
मुख्यमंत्रिपदासाठी आता नव्या नावाची चर्चा?

- विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल आठ दिवस उलटले असले तरी देखील अद्याप मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री कोण होणार? याची चर्चा रंगत आहे.
- मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची नावे आग्रही आहेत. परंतु, आता मुख्यमंत्री पदासाठी पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
- मात्र या संदर्भात मोहोळ यांनी सोशल मीडिया एक्सवर ट्विट करत या सर्व बातम्या फेटाळल्या आहेत. यावेळी मोहोळ यांनी समाजमाध्यमांमधून माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निर्थरक आणि कपोलकल्पित असल्याचे त्यांनी ट्विटद्वारे नमूद केले आहे.
- तसेच आम्ही भाजप म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणुक फडणवीस यांच्या नेतृत्वात लढलो आहोत. तसेच यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने कौल देखील ऐतिहासिक दिला असल्याचे मोहोळ म्हणाले.



