देश - विदेश

खतरनाक! कर्नाटकातील लड्डू मुत्या बाबाची तुफान ‘हवा’

  • सोशल मीडियावर काय व्हायरल होईल, याचा काही नेम नाही. सोशल मीडियावर सध्या असे अनेक रिल्स तुम्ही पाहिले असतील. धावता पंखा हाताने थांबवत पंख्याच्यावरची धूळ कपाळी लावणारा ‘फॅनबाबा’ चांगलाच प्रसिद्धी झोतात आला आहे. हा फॅनवाला लड्डू मुत्या बाबा कोण आहे? याची जोरदार चर्चा रंगली आहे.
    आता दोन तीन जणांच्या खांद्यावर बसत हाताने पंखा थांबवणाऱ्या लड्डू मुत्या बाबांच्या व्हिडिओसारखे अनेकांनी रिल्स, व्हिडीओ बनवले असून नेटकच लड्डू मुत्या बाबांसारखी पंखा थांबवून धूळ लावण्याची नक्कल करू लागले आहेत.
    कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्या बाबा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. सोशल मीडियावर त्यांच्या फॉलोअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे. एकीकडे हा फॅन थांबवण्याचा चमत्कारिक प्रकार पाहण्यासाठी आणि लड्डू मुत्या बाबांचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. हे लड्डू मुत्या बाबा लोकांना प्रवचनही देतात, असे सांगण्यात येत आहे. अनेक लोक त्यांना पंखेवाले बाबा म्हणूनही ओळखतात. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भाविकाच्या घरातील जोरात सुरु असलेला फॅन हाताने थांबवून भाविकाला आशीर्वाद दिला होता. त्यानंतर या बाबाची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली.
    सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी लड्डू मुत्या बाबाला चांगलेच उचलून घेतले. हे बाबा म्हणे फिरता पंखा हाताने थांबवून पंख्याची धूळ आशीर्वाद म्हणून भक्तांना लावतात. मागे लड्डू मूत्या बाबांच्या स्तूतीचे गाणे सुरु असते. या बाबाच्या चमत्कारिक व लक्ष वेधून घेणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर रिल्स बनवून खळखळून हसवले आहे.

Related Articles

Back to top button