सोलापूर
अमित शहांच्या भेटीने काहीही होणार नाही

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला आहे. हा वाद शांत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे मध्यस्थी करणार आहे. त्यासाठी १४ डिसेंबर रोजी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलवले आहे. मात्र, त्यानंतरही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचले आहे. त्यांनी टि्वट करत शहा यांचा अवमान केला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीने काहीही होणार नाही. सीमाप्रश्नी कोणतीही तडजोड नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. कायदेशीर भूमिका मांडण्यासाठी मी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार आहे. महाराष्ट्राच्या खासदारांनी गृहमंत्र्यांना भेटून काहीही फरक पडणार नाही. न्यायालयात कर्नाटकाची बाजू मजबूत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.