महाराष्ट्र

ब्रेकिंग! मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर

  • मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, उद्यापासून मी पाणी पिणे बंद करणार आहे. त्यांच्या या निर्णयामुळे आंदोलनाची धग आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
  • जरांगे म्हणाले की, गेल्या 70 वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे, असे सांगितले जात आहे. पण ते प्रत्यक्षात मिळालेच नाही. आज लाखो गरीब मराठा मुंबईत आले आहेत. सर्व समाजातील गोरगरीब लोक या आंदोलनात सेवा करत आहेत. जर राज्यातील गरीब मराठे मुंबईकडे येत असतील, तर त्यांनी आपली गाडी थेट ग्राउंडवर आणू नये. रेल्वेने आझाद मैदानावर पोहचावे. गाड्या सुरक्षित राहतील, असेही जरांगे म्हटले आहे.
  • आता जरांगे यांच्या उद्यापासून पाणी पिणे बंद या घोषणेमुळे आंदोलनात मोठी कलाटणी येणार असून राज्य सरकारवर या निर्णयाचा तातडीने दबाव वाढणार आहे.

Related Articles

Back to top button