देश - विदेश

ब्रेकिंग! पहलगाम हल्ल्यानंतर आज पुन्हा घुसखोरीचा प्रयत्न

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच आज जवानांनी अतिरेक्यांच्या घुसखोरीचा डाव हाणून पाडला. या दरम्यान सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. ही घटना बारामुला जिल्ह्यातील उरी नाला परिसरात घडली.

भारतीय सैन्याच्या माहितीनुसार आज दोन ते तीन दहशतवादी बारामुल्लातून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, या भागात भारतीय सैन्य सतर्क होते. त्यांनी लागलीच प्रत्युत्तरास सुरुवात केली. त्यांना प्रतिकार केला. त्यामुळे चिडलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबारास सुरुवात केली. याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जवानांनीही गोळीबार केला. या गोळीबारात दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला.

या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांकडे हत्यारे आणि युद्धाशी संबंधित अन्य वस्तूंचा मोठा साठा होता. हा सगळा साठा भारतीय सैन्याने ताब्यात घेतला आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे. या चकमकीनंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button