निलंबित पोलिसाचा भलताच उद्योग

राज्यात अलीकडे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान, चंद्रपूरमधील चिमूरमध्ये बेपत्ता असलेल्या एका महिलेचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह नागपुरमधील हरिश्चंद्र गावाजवळील निर्जनस्थळी आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाचा छडा वेगाने लावत नरेश डाहुले या निलंबित पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे.
अरुणा काकडे (37) असे या मृत महिलेचे नाव असून काकडे देवांश जनरल स्टोअर्सच्या संचालिका आहेत. 26 नोव्हेंबरला त्या नागपुरातील दुकानात सामान खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. सामान खरेदी करण्यासाठी गेलेल्या काकडे घरी परतल्याच नाहीत. त्यामुळे कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवले. नरेश आणि अरुणा हे दोघेही लहानपाणापासून एकाच शाळेत शिकले होते. 26 रोजी मृत महिला अरुणा आणि नरेश नागपूरला गेले होते. त्याचवेळी दोघांमध्ये काही कारणांमुळे वाद झाला. हा वाद विकोपाला गेला त्यानंतर नरेशने अरुणा यांचा गळा दाबून खून केला.
दरम्यान, नरेशने खून केल्यानंतर मृतदेह हरिश्चंद्र येथील एका निर्जनस्थळी असलेल्या घरातील शौचालयाच्या टाकीत लपवून ठेवला. त्यानंतर नरेश फरार झाला. पोलिसांनी त्याचा कॉल रेकॉर्डच्या सहाय्याने शोध घेतला. नरेश याचा घरफोड्यांसारख्या केसमध्ये समावेश असल्याचे आढळून आले होते. त्यामुळेच त्याला मागील वर्षी पोलिसांनी अटक केली होती. तसेच त्याचवेळी त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.