क्राईम

ब्रेकिंग! सोलापूर जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड

  • सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या कुंभार गल्लीत मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची निर्घृण हत्या राहत्या घरात करण्यात आली आहे. एकाच वेळी झालेल्या डबल हत्येने खळबळ उडाली आहे. पंढरपूरच्या कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत. तर सुरेखा जगताप यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले. 
  • लखन हा पंढरपूरमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. 
  • रात्री नऊच्या सुमारास लखन काम आटपून घरी आला. यानंतर घरी आई सुरेखा आणि लखन हे दोघेच होते. काही वेळाने रात्री पावणे दहा वाजता लखनचे वडील संजय जगताप हे आपल्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना घरात मुलगा लखन आणि त्यांची पत्नी सुरेखा यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. 
  • लखन आणि सुरेखा यांची नऊ-साडेनऊच्या दरम्यान हत्या झाल्याचा अंदाज आहे. यावरून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच संबंधित घराच्या लोकेशनवरून फोन कॉल, सीडीआर, घराच्या आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे. 
  • लखन आणि सुरेखा यांची हत्या नक्की कुणी केली? हत्येचे कारण काय? याबाबत कुठलीच ठोस अशी प्राथमिक माहिती पुढे आली नाही. मात्र रात्रभर पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

Back to top button