महाराष्ट्र
शाळा 15 जूनपासून सुरु, पण ऑनलाईन की ऑफलाईन?

- राज्यात शालेय शिक्षणाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आता शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, नवीन शैक्षणिक वर्ष ठरल्याप्रमाणे म्हणजे १५ जूनपासून सुरू होणार आहे.
राज्यातील शाळा उशिरा सुरू होणार किंवा शिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार, यांसारख्या अफवांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. कारण सर्व शाळा पारंपरिक पद्धतीने, म्हणजेच ऑफलाईन स्वरूपात सुरू राहतील. शाळांना यंदा दोन मेपासून उन्हाळी सुट्ट्या होत्या. या सुट्ट्या संपल्यानंतर १५ जूनला शाळा सुरु होणार असून या निर्णयामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व स्तरांवरील शाळांसाठी हेच वेळापत्रक लागू असेल. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने ऑफलाईन शिक्षणावर भर दिला आहे, त्यामुळे १५ जूनपासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पुन्हा एकदा उत्साह पाहायला मिळणार आहे.



