क्राईम
ब्रेकिंग! ट्रॅफिक पोलिसाच्या डोक्यात घातला दगड

- गुन्हेगारीची पाळेमुळे खणून काढणाऱ्या वाहतूक पोलिसांवरच हल्ला होत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. फोनवर बोलत बाईक चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्याने वाहतूक पोलिसावर प्राणघातक हल्ला झाल्याचे समोर आले आहे. राजेश गणपत नाईक (वय ४७) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. पुण्यातील फुरसुंगीतील भेकराईनगर चौकात हा खळबळजनक प्रकार घडला. राजेश नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
- नाईक यांनी बाईक चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवले. त्यानंतर रागाच्या भरात त्या व्यक्तीने रस्त्यात पडलेला दगड नाईक यांच्या डोक्यात मारला. यात नाईक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.