देश - विदेश
ब्रेकिंग! तिरुपती लाडू वाद ; पुन्हा ट्विस्ट
तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादावरून सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. यातच आता या प्रकरणात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्यातील सर्व मंदिरांमध्ये लवकरच ‘स्वच्छता मोहीम’ राबवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
तेलगू देसम पक्षाच्या कार्यालयात माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री नायडू यांनी ही घोषणा केली आहे. तसेच धार्मिक भावनांचा आदर राज्य सरकार करणार असे देखील ते म्हणाले.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भाविकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या लाडूच्या प्रसादात जनावरांच्या चरबीच्या भेसळीच्या आरोपानंतर सरकार पुजारी आणि हिंदू धर्मातील इतर शीर्ष तज्ञांशी सल्लामसलत करेल आणि सल्लामसलत केल्यानंतर सरकार तिरुमला तिरुपती देवस्थानम निर्णय घेणार जे तिरुपती येथील जगप्रसिद्ध श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे अधिकृत संरक्षक आहे.