बिजनेस
खुशखबर! बँकेत नोकरी करायची सुवर्णसंधी

बँकेत सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन बँकेद्वारे स्थानिक बँक अधिकाऱ्याच्या रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत तब्ब्ल तीनशे रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. इंडियन बँकेने जाहीर केलेल्या भरती प्रक्रियेत सामील होण्यासाठी तुम्ही दोन सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकता.
इच्छुक उमेदवार इंडियन बँकेच्या indianbank.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ, संस्थेतून कोणत्याही विषयात पदवीधर असणे आवश्यक आहे.
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे किमान वय 20 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तसेच एक जुलै 2024 रोजी वयाची गणना केली जाणार आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयात सूट देण्यात येणार आहे.



