क्राईम

ट्रॅफिकमध्ये अडकली अन् जीव वाचला

  • अहमदाबादमध्ये काल घडलेल्या भीषण विमान दुर्घटनेत 240 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असताना, एका तरुणीचा फक्त दहा मिनिटांचा उशीर तिच्यासाठी फायदेशीर ठरला. अहमदाबादमध्ये राहणारी भूमी चौहान ही लंडनला जाणाऱ्या AI-171 फ्लाईटच्या प्रवाशांपैकी एक असणार होती. मात्र ट्रॅफिक जॅममुळे ती विमानतळावर वेळेवर पोहोचू शकली नाही आणि तिचे बोर्डिंग चुकले आणि हेच तिचे भाग्य ठरले.
  • भूमीने मीडियाशी बोलताना सांगितले की, माझे विमान 1.10 वाजता होते, पण मी ट्रॅफिकमुळे दहा मिनिट उशिरा पोहोचले. बोर्डिंग गेट बंद झाले होते आणि मला प्रवेश नाकारण्यात आला. मी नाराज होऊन एक्झिट गेटकडे चालत होते, तेवढ्यात मला कळले की तेच विमान कोसळले. त्याक्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली. माझ्या गणपती बाप्पाने मला वाचवले, असेही ती भावनिकपणे म्हणाली.
  • भूमी सध्या लंडनमध्ये आपल्या पतीसोबत राहत असून सुट्टीसाठी भारतात आली होती. दोन वर्षांनंतर ती पहिल्यांदाच भारतात परतली होती. लंडनला परत जात असताना ही दुर्घटना घडली आणि ती नशिबाने बचावली.

Related Articles

Back to top button