खेळ

करोडो भारतीयांचे स्वप्न भंगले : टीम इंडिया वर्ल्ड कप मधून बाहेर

T20 World कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून भारताचा दारूण पराभव झाला. भारत गोलंदाजी करण्यास उतरल्यानंतर कोणाला वाटलेही नव्हते की ते इतकी खराब कामगिरी करतील. आव्हान गाठेपर्यंत भारताला इंग्लंडचा एकही विकेट मिळवण्यात यश मिळाले नाही.

इंग्लंडचा सलामीवीर हेल्स आणि जोस बटलर या दोघांनी शेवटपर्यंत किल्ला लढवताना हे आव्हान सहज पूर्ण केले आणि भारतावर 10 विकेट राखत विजय मिळवला. या विजयासह त्यांनी वर्ल्डकपच्या फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.  
प्रथम फलंदाजी करताना भारताने इंग्लंडविरुद्ध २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या. इंग्लिश संघाला १६९ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य मिळाले. टीम इंडियाकडून हार्दिक पंड्याने सर्वाधिक ६३ धावा केल्या. त्याने ३३ चेंडूंत ४ चौकार आणि ५ षटकार मारले.
हार्दिक शेवटच्या चेंडूवर हिट विकेटद्वारे बाद झाला. त्याच्याशिवाय कोहलीने ४० चेंडूत ५० धावांची खेळी खेळली. हार्दिक आणि कोहली वगळता एकाही फलंदाजाला भारतासाठी मोठी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतर कर्णधार रोहित शर्मा २७ धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादवने १४ धावा केल्या. ऋषभ पंत ६ आणि केएल राहुलने ५ धावा केल्या. रविचंद्रन अश्विन एकही चेंडू न खेळता शून्यावर नाबाद राहिला.

Related Articles

Back to top button