राजकीय

ब्रेकिंग! जयंत पाटील यांच्याविरोधात काँग्रेसचीच निवडणूक आयोगात तक्रार

  • सध्या राज्यातील विविध भागात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला वेग आला आहे. काही राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे आगामी काळात या निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे. दरम्यान सांगलीत महाविकास आघाडीत बिघाडी दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी ही तक्रार देण्यात आली आहे.
  • इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या मालकी हक्कावरून काँग्रेसकडून ही तक्रार दाखल केली आहे. इस्लामपूरमध्ये शरद पवार गट आणि काँग्रेसमधील कार्यालयाचा वाद आता पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
  • आता याच प्रकरणी जयंत पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. 

Related Articles

Back to top button