महाराष्ट्र

ब्रेकिंग! शिंदे गटात नाराजीचा बॉम्ब फुटला

राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात संधी न मिळाल्याने शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी तडकाफडकी उपनेतेपद आणि विदर्भ समन्वयपदाचा राजीनामा दिला, तर माजी मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत यांचा पत्ता कट केल्याने तिन्ही नेत्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराकडे पाठ फिरवत नाराजी व्यक्त केली.

गेल्या दहा दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या महायुती सरकारचा विस्तार रविवारी पार पडला. नव्या मंत्रिमंडळात शिंदे गटाने काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली. मागील अडीच वर्षे आशेवर असलेल्या भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, डॉ. आशिष जैस्वाल यांच्या गळ्यात अखेर कॅबिनेट मंत्रीपदाची माळ पडली. महायुती सरकार सत्तेच येताच शिंदे गटातील आमदारांनी मंत्रीपदासाठी संधी मिळावी, यासाठी जोर लावला होता.

महायुती सरकारमध्ये मंत्रीपदावर पुन्हा संधी मिळावी, यासाठी माजी मंत्री दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांचे प्रयत्न सुरू होते. परंतु, भाजपने काही जणांच्या नावावर आक्षेप घेतला होता, त्यात या तिन्ही नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे तिन्हीं माजी मंत्र्यांना संधी मिळणार नाही, अशी चर्चा होती, तरीही वरिष्ठ असल्याचे सांगत मंत्रीपदासाठी शिंदे यांच्याकडे लॉबिग सुरू केली. शिंदे यांनी तिघांनाही आश्वासन दिले. मात्र, शपथविधीच्या दिवशीच तिघांचेही पते कापल्याने तिघेही प्रचंड नाराज झाले.

Related Articles

Back to top button