हवामान

राज्यात हवापालट! आजपासून पावसाचा जोर ओसरणार

  • मागील सात ते आठ दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घालत असलेला पाऊस आता ओसरू लागला आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरत आहे. गुरुवारपासून पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज विभागाने व्यक्त केला होता. त्यानुसार काल दुपारपासूनच राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर गुरुवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज सकाळी ढगाळ हवामान मात्र कायम आहे.
  • मागील चार दिवसांच्या तुलनेत काल पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. अनेक भागात सूर्यदर्शनही झाले. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती. आज पाऊस विश्रांती घेईल. काही ठिकाणी अधूनमधून हलका ते मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
  • मागील आठवड्यापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत होता. अरबी समु्द्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात अतिवृष्टी झाली. या पावसाचा जोर मुंबईत सर्वाधिक होता. रायगड, रत्नागिरी, ठाणे या जिल्ह्यांत तुफान पाऊस झाला. पुण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली होती. 

Related Articles

Back to top button