क्राईम
काँग्रेस महिला नेत्याच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

- काँग्रेस कार्यकर्त्या हिमानी नरवाल हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तब्बल ३६ तासांच्या तपासानंतर पोलिसांनी मुख्य आरोपी सचिन याला दिल्लीतून अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन हा हरियाणातील काँग्रेस कार्यकर्त्या हिमानीचा मित्र होता आणि तिची हत्या त्याच्याच घरात करण्यात आली.
- त्यानंतर मृतदेह सुटकेसमध्ये भरून सांपला बस स्टँडवर टाकून आरोपी फरार झाला होता. एक मार्च रोजी रोहतक हायवेवरील सांपला बस स्टँडवर हिमानीचा मृतदेह आढळला. तो एका सुटकेसमध्ये कोंबलेला होता आणि मृतदेहाचा चेहरा निळसर पडलेला होता. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास सुरू केला.
- तपासादरम्यान, मृतदेह ८०० मीटर अंतरावरून आणला गेला असल्याचे आढळले. आरोपी सचिनने आपल्या विजयनगर येथील घरात हिमानीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि बस स्टँडवर टाकून पळ काढला. पोलिसांनी सचिनचा माग काढत त्याला दिल्लीतून अटक केली आहे.
- आरोपी सचिन याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून हिमानीचा मोबाईल आणि दागिने हस्तगत केले आहेत. हत्या कशामुळे झाली याबाबत तपास सुरू आहे. पोलिसांच्या मते, ही हत्या व्यक्तिगत वादातून झाल्याची शक्यता आहे.



