देश - विदेश
अत्यंत आलिशान, हलके वजन

- अहमदाबाद येथील विमानतळावर काल एअर इंडियाचे एक प्रवासी विमान कोसळले. या दुर्घटनेत विमानात सुमारे २५० प्रवासी व क्रू मेंबर्स होते. विमान झेप घेतानाच काही क्षणांत त्याचा संपर्क तुटला व त्यानंतर अपघात झाला. AI 171 हे फ्लाईट लंडनकडे रवाना होत होते.
-
अहमदाबादहून लंडनसाठी उड्डाण करणारे हे विमान बोईंग 787-8 ड्रीमलायनर होते. हे विमान ११ वर्षांपूर्वी एअर इंडियाच्या ताफ्यात समाविष्ट झाले होते. हे अत्याधुनिक सुविधा असलेले, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी वापरले जाणारे विमान असून जगभरातील अनेक प्रमुख विमान कंपन्यांकडे हे मॉडेल आहे.
- बोईंग 787-8 ड्रीमलायनर ही खूप महागडी आणि अत्याधुनिक श्रेणीतील विमान प्रकार आहे. एका विमानाची अंदाजे किंमत 248 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 2,069 कोटी रुपये इतकी आहे. या विमानाची उंची 16.9 मीटर आहे. तर ताशी 913 किमी वेगाने ते उड्डाण करू शकते.



