देश - विदेश

ब्रेकिंग! अहमदाबाद विमान अपघातात सोलापुरातील वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू

  • भारतीय विमान वाहतुकीच्या इतिहासात आज काळा दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला.
  • हा अपघात झाला त्यावेळी विमानात 232 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर होते. दरम्यान यात वृद्ध जोडपं होते जे आपल्या लाडक्या लेकाला भेटण्यासाठी जात होते. पण त्यांची ती इच्छा अपूर्णच राहीली. हे जोडपं सांगोल्याचे होते.
  • महादेव पवार वय वर्ष 67, आशा पवार वय वर्ष 55. हे वृद्ध दाम्पत्य मुळचे सांगोल्याचे रहिवाशी आहेत. त्यांचा एक मुलगा लंडनला असतो. तर दुसरा मुलगा हा अहमदाबादला असतो. दोघांचेही व्यवसाय आहेत. लंडनला जो मुलगा आहे त्याचा बेकरीचा बिझनेस आहे. त्याला भेटण्यासाठी पवार दाम्पत्य जाणार होते. त्यांनी विमान अहमदाबादवरून पकडण्याचा निर्णय घेतला होता.
  • कारण त्यांचा दुसरा मुलगा हा अहमदाबादला राहातो. त्यामुळेच त्यांनी अहमदाबादवरून जाण्याचा निर्णय घेतला. लाडक्या लेकाला भेटण्याची उत्सुकता त्यांना होती. त्यामुळे ते वेळेत विमानतळावर पोहोचले. पुढच्या पाच तासात आपण लंडनमध्ये असून लाडक्या लेकाला भेटी ही स्वप्न ते दोघेही पाहात होते. घरच्यांचा निरोप घेवून ते निघाले. लंडनमध्ये असलेल्या मुलाला ही आपण निघालो असल्याचे कळवले.
  • ठरल्या वेळेप्रमाणे विमानातही ते बसले. पण पुढे काय होणार आहे याची पुसटती कल्पनाही त्यांच्या मनाला शिवली नसेल. त्यांच्या मनात लंडन आणि आपला मुलगा हेच घोळत होते. विमान वेळेत सुटले. पण वेळेत ते पोहचू शकले नाही. उड्डाण केल्यानंतर काही सेकंदात हे विमान कोसळले. आगीचे लोळ आकाशात उटले. क्षणात सर्व काही संपले. कुणाला वाचवण्याची संधी ही मिळाली नाही. या अपघातात पवार दाम्पत्याचेही निधन झाले. ते सांगोला तालुक्यातील हातिद गावचे होते.

Related Articles

Back to top button