महाराष्ट्र
लग्नाला गेलो ती चूक असेल तर मला फासावर लटकवा

- पुण्यातील पिंपरी येथील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे राज्यात खळबळ माजली आहे आणि त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव ओढले जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे. वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या विवाह सोहळ्याला अजितदादा स्वतः उपस्थित होते. या विवाहात त्यांच्या हस्तेच वधू-वरांना फॉर्च्युनर गाडीची किल्ली देण्यात आली होती.
- या पार्श्वभूमीवर आता विरोधकांकडून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत की, त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्याच्या घरातल्या लग्नाला उपस्थित राहून अप्रत्यक्षपणे हुंड्याला मान्यता दिली. मात्र यावर प्रतिक्रिया देताना अजितदादा म्हणाले, कुणाच्या लग्नाला गेलो ही माझी चूक असेल तर मला फासावर लटकवा.
- मी त्या कुटुंबाचा मेहुणा नाही आणि मी आरोपींचा वकील नाही. माझे नाव या प्रकरणात उगाच खेचले जात आहे. राजकीय हेतूंनी प्रेरित होऊन आपली बदनामी केली जात असल्याचा दावा करत दोषी कोण असेल त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असेही अजितदादा यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी पोलिस प्रशासनाला आधीच कडक कारवाईचे निर्देश दिल्याचेही स्पष्ट केले.



