क्राईम
इंदापूर गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

इंदापूर गोळीबार प्रकरणातील जखमी तरुणाचा काल पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राहुल अशोक चव्हाण असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलीसांकडे केलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन मागील सोमवारी सायंकाळी रात्री पावणेसात ते सात वाजण्याच्या दरम्यान इंदापूर महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच राहुल याच्यावर गोळीबार करण्यात आला होता.
इंदापूर व अकलूज येथील खाजगी रुग्णालयात उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी राहुलला पुण्यातल रुग्णालयात दाखल केले होते. शरीरात घुसलेल्या तीन गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले होते.
मात्र, मणक्यामध्ये घुसलेल्या एका गोळीमुळे मूत्रपिंडामध्ये संसर्ग झाला. त्यामुळे राहुलची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर संपली. दरम्यान, ससूनमधील शवविच्छेदन झाल्यानंतर राहुलचा मृतदेह त्याच्या शिरसोडी या मूळ गावी आणण्यात येणार आहे.