राजकीय

ब्रेकिंग! महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोण?

  • महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. या विजयानंतर राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत रंगली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत.महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
  • महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीची रस्सीखेच जरी सुरू असली तरी सर्व पक्ष सामंजस्याने निर्णय घेतील, असा दावा केला जात आहे. काही नेत्यांच्या मते, भाजपकडून तिसऱ्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. तिसऱ्या पर्यायामध्ये अजित पवारांचे नाव येणार का? अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे आणि फडणवीस यांची टक्कर तीव्र होणार आहे. दरम्यान याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, अशी शक्यता आहे. 

Related Articles

Back to top button