पुणे हादरले ! काजू कतली फुकट न दिल्याने स्वीटमार्ट दुकानात गोळीबार

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात स्वीट मार्टच्या दुकानात मिठाई घेण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना काजू कतली, मिठाई दुकानदाराने फुकट न दिल्याने त्यांनी दुकानात गोळीबार केली आहे. पोलीसांनी याप्रकरणी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे.
सुरज मुंढे (वय २३, रा.माणिकबाग) असे आरोपीचे नाव आहे. तर त्याचा १७ वर्षाचा अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी दिली. ही घटना सिंहगड मार्गावरील फुलपरी स्वीट मॉल येथे घडली. दुकान मालक जोधाराम धिसाजी चौधरी (वय ५०, रा.दत्तवाडी, पुणे) यांनी पोलीसांकडे तक्रार दिली.
चौधरी हे दुकानात काऊंटरवर बसलेले असताना आरोपी सुरज हा त्याचा साथीदारासह दुकानात आला. त्याने एक किलो फुकट काजु कतली मागत पैसे देणार नाही, असे धमकावले. मात्र, चौधरी यांनी देणार नाही असे म्हणताच त्याने पिस्तुल बाहेर काढून ते चौधरी यांचावर रोखले. एवढेच नाही तर त्याने चार वेळा ट्रीगर दाबून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने पिस्तुल मधून एकही गोळी फायर झाली नाही. यामुळे चौधरी बचावले.