सिर पर हिजाब और हाथ में भगवा

येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रमुख नेत्यांचे समर्थक देखील त्यांच्या आवडत्या नेत्यांना विजयी करण्यासाठी तयारीला लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील मोठा चाहता वर्ग आहे. यात हिंदू धर्मीयांप्रमाणेच मुस्लिम धर्मीय आहेत.
अशीच एक मोदी यांची चाहती असलेली मुस्लिम मुलगी ही मोदी पुन्हा निवडून यावेत यासाठी हजारो किलोमीटर असलेल्या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेवर निघाली असून ती या ठिकाणी जलाभिषेक करणार आहे.
ही मुलगी तिच्या एका सहकाऱ्यासह या लांबच्या प्रवासाला निघाली आहे. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवडून यावेत, अशी तिची इच्छा आहे. यासाठी ती हा खडतर प्रवास करणार आहे. ही मुलगी मुंबईहून सायकलवरून निघाली आहे.
शबनम शेख असे या मुस्लिम तरुणीचे नाव आहे. ती तिच्या मित्रासोबत बरवानी जिल्ह्यातील सेंधवा येथील राष्ट्रीय महामार्गावर पोहोचली. डोक्यावर हिजाब आणि सायकलवर भगवे झेंडे घातलेल्या शबनमने सांगितले की, ती देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ती खूप मोठी फॅन आहे. मोदी यांना तिला तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना पहायचे आहे. यासाठी ती भगवान शंकराला जलाभिषेक करणार असून यासाठी ती देशभरातील १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रवासाला निघाली आहे.



