देश - विदेश

ब्रेकिंग! राम आएंगे! देशातील हिंदू प्रथमच एकवटले

अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात आज प्रभू श्रीराम विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. आज दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे.
या सोहळ्याला मंदिराच्या गाभाऱ्यात पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांची उपस्थिती प्रामुख्याने असणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी राजकारणातील दिग्गज नेते, कलाकार मंडळी तसेच हजारो रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. देशातील वैदिक विद्वान या महोत्सवाची पूजा करतील. त्यानंतर मोदी यांच्या हस्ते श्रीरामांची मूर्ती मंदिरात विराजमान केली जाईल. दरम्यान या निमित्त सोलापुरातदेखील उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. या सोहळ्यानिमित्त देशातील हिंदू प्रथमच एकवटले आहेत.

Related Articles

Back to top button