देश - विदेश

ब्रेकिंग! गडकरींची तब्येत अचानक बिघडली

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तब्येत आज अचानक बिघडली. पश्चिम बंगालमधील एका कार्यक्रमात हा प्रकार घडला. या कार्यक्रमात भाषण करताना गडकरींना अचानक चक्कर आली. यामुळे तत्काळ आपले भाषण थांबून गडकरी हे आपल्या खुर्चीवरून जाऊन बसले. दरम्यान या प्रकारानंतर त्वरित स्थानिक डॉक्टरांना बोलावण्यात आले आणि गडकरींवर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले.

  1. गडकरींच्या शरीरातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान सध्या गडकरींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या सर्व प्रकारानंतर गडकरी यांना स्थानिक भाजप नेत्याच्या घरी नेण्यात आले.
आता गडकरी यांना बरे वाटू लागले आहे. यापूर्वी सुद्धा गडकरींच्या बाबतीत असाच प्रकार घडला होता. 2010 मध्ये जंतर-मंतर येथील कार्यक्रमात गडकरी यांना चक्कर आली होती. तर सप्टेंबर 2018 मध्ये अहमदनगर येथील एका कार्यक्रमात गडकरींना चक्कर आली होती.

Related Articles

Back to top button