बिजनेस
खुशखबर! आता UPI आणि एटीएमद्वारे काढता येणार पीएफचे पैसे

- कामगार आणि रोजगार मंत्रालय लवकरच देशातील कोट्यवधी लोकांना आनंदाची बातमी देणार आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ निधी आता UPI आणि एटीएमद्वारे काढण्याची सुविधा कामगार आणि रोजगार मंत्रालय उपलब्ध करून देणार आहे. ज्याचा फायदा देशातील कोट्यवधी लोकांना होणार आहे.
- याबाबत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी सांगितले की, ही नवीन सुविधा मे किंवा जूनच्या अखेरीस सुरु करण्यात येणार आहे. डावरा म्हणाल्या की, नवीन प्रणालीअंतर्गत, ईपीएफओ सदस्य तात्काळ एक लाखपर्यंत पैसे काढू शकतील आणि ही रक्कम त्यांच्या पसंतीच्या बँक खात्यात हस्तांतरित करू शकतील. याशिवाय सदस्यांना UPI वर त्यांचे पीएफ बॅलन्स देखील तपासता येईल. या बदलामुळे केवळ आर्थिक सुविधा वाढणार नाहीत तर शिक्षण, लग्न आणि वैद्यकीय उपचारांसाठी निधी लवकर काढणे देखील शक्य होणार आहे.



