देश - विदेश
ब्रेकिंग! भारताला धमक्या देणाऱ्या पाकचा ‘नूर’ बदलला

- दहशतवादाविरुद्ध भारताच्या मोठ्या लष्करी कारवाईने पाकिस्तानला जबरदस्त धक्का बसला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानचे अनेक महत्त्वाचे हवाई तळ आणि लष्करी तळ उद्ध्वस्त केले आहेत. आता दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी लागू झाली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. त्यानंतर आता पाकिस्तान पीएम यांनी हात जोडून भारत सरकारसोबत शांततेसाठी संवाद साधण्याची भूमिका व्यक्त केली आहे.
- पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारतासोबत शांततासंबंधी चर्चेची इच्छा व्यक्त केली आहे. तथापि, त्यांनी एक अट घातली आहे की, ही शांतता चर्चा काश्मीरच्या मुद्द्यावर असावी.
- कामरा एअरबेसवर पाक हवाई दलाच्या वैमानिक आणि सैनिकांशी बोलताना, पाक लष्कराला संबोधित करताना शरीफ यांनी हे विधान केले आहे. ते म्हणाले की, पाकिस्तान शांततेसाठी बोलण्यास तयार आहे, परंतु त्यासाठी काही अटी आहेत. त्यांनी काश्मीरवर भारताशी चर्चा करण्याची मागणी केली.
- दरम्यान भारताने म्हटले आहे की, फक्त दहशतवादावरच चर्चा केली जाईल. तर भारताने आधीच स्पष्ट केले आहे की, जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य आणि अजिंक्य भाग आहेत आणि राहतील.



