देश - विदेश
भारताने सज्जड दम देताच डरपोक पाकिस्तानकडून…

- ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले केले, क्षेपणास्त्रे डागली. पण भारताने हा सर्व हल्ला परतवून लावला. शिवाय पाकिस्तानवर असा प्रतिहल्ला केला की, अवघ्या ८६ तासांतच पाकिस्तान भारताला शस्त्रसंधी करा, म्हणून विनवणी करू लागला.
- त्यानुसार शस्त्रसंधी केली, मात्र त्यानंतरही काही तासांतच म्हणजे शनिवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतावर हल्ला केला. त्यावेळीही भारताने पाकिस्तानला मजबूत चोपले. दरम्यान रविवारी भारताच्या डीजीएमओच्या पत्रकार परिषदेत
- तिन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी पाकला सज्जड दम दिला. त्यामुळे पाकिस्तानने रविवारी रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे धाडस दाखवले नाही.
- शनिवारी पाकिस्तानने शस्त्रसंधीचा निर्णय घेऊन तो मोडला आणि भारताच्या सीमा भागात आणि सैन्य तळांवर ड्रोन हल्ले केले. परंतु सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने हे हल्ले परतवून लावले आणि मजबूत प्रतिहल्ला केला. ज्यामुळे पाकिस्तानने काही तासांतच हल्ले थांबवले.
- परंतु रविवारी भारताच्या डीजीएमओ यांच्या नेतृत्वाखाली तिन्ही सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी डीजीएमओ राजीव घई यांनी भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यानंतर दोन दिवस झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानची कशी वाट लावली, याचे सविस्तर कथन केले. तसेच पुन्हा पाकिस्तानला जर भारतावर हल्ला करण्याची इच्छा असेल तर त्यांनी यावे. आमचे सैन्य संपूर्ण तयारीनिशी त्यांना धडा शिकवेल, असा दम रविवारी पत्रकार परिषदेत दिला. या दमबाजीनंतर पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली. रविवारी रात्री सीमा भागात निरव शांतात होती.
- पाकिस्तानने शनिवारप्रमाणे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची हिंमत केली नाही. पाकिस्तानने मुकाटपणे शस्त्रसंधीचे पालन करण्यास सुरुवात केली आहे. अर्थात हे किती काळ टिकेल ते नंतर कळणारच आहे.