देश - विदेश

बिग ब्रेकिंग! भारत-पाकिस्तान युद्धाची तारीख अखेर ठरली?

  • पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला आहे. या हल्ल्यानंतरही पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन कऱण्यात येत आहे. तर भारताकडूनही सिंधू पाणी करार पुढे ढकलण्यात आला आहे. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. पण या सर्व गोष्टींही ट्रेलरच्या स्वरूपात पाहिल्या जात आहेत. पण भारताकडून पाकिस्तानवर अजून कोणताही मोठा हल्ला झालेला नाही. पण पंतप्रधान मोदींनी लष्कराच्या हाती चावी सोपवली आहे. भारताचा आक्रमक दृष्टिकोन आणि पाकिस्तानच्या कृती पाहता युद्ध निश्चित मानले जाते.
  • भारताची तयारी पाहता भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. पाकिस्तानात बसलेल्या लोकांनाही हे माहित आहे. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अलिकडेच एक विधान केले आहे. त्यांनी सांगितले की,
  • सध्या भारत युद्धाची जोरदार तयारी करत आहे. त्यामुळे येत्या १० किंवा ११ मे रोजी भारत पाकिस्तानवर हल्ला करु शकतो.

Related Articles

Back to top button