हवामान

सावधान! हवामान बदलते आहे

राज्यात थंडी चांगलीच पडली असून दिवसा मात्र उकाडा जाणवत आहे. त्यामुळे सकाळी थंडी आणि दुपारी उकाडा अशी स्थिती सध्या राज्यात आहे. उत्तर भारतात धुके आणि थंडीने कहर केला असतानाच त्याचा मोठा फटका महाराष्ट्रातही बसत आहे. मागील 24 तासांत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात एक- तीन अंशांनी तापमान घसरले.

तर कोकण, मराठवाड्यात सामान्य तापमानाच्या तुलनेत एक- तीन अंश अधिक तापमानाची नोंद झाली. हवेत गारठा असून कोरडे थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात थंड वातावरण आहे. येत्या काही दिवसात राज्यात गारठा काहीसा वाढणार आहे. तर दुसरीकडे पुढील दोन दिवसात किमान तापमानात फारसा बदल नाही.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या 3-4 दिवसांत कमाल तापामानात फारसा बदल होणार नाही.

किमान तापमान येत्या तीन दिवसांत तीन अंशांनी कमी होणार आहे. त्यानंतर हळूहळू त्यात वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात येत्या दोन दिवसात किमान आणि कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून त्यानंतर तापमान घसरेल. राज्यात पुढील पाचही दिवस कोरड्या हवामानाची शक्यता असून थंड वाऱ्यांचे प्रवाह वाहत असल्याने गारठा वाढणार आहे.

Related Articles

Back to top button