देश - विदेश

BIG BREKING! ड्रायव्हिंग लायसनबाबत नवे नियम जारी

सोलापूर शहर व परिसरात वाहनधारकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आवश्यक कागदपत्रे न बाळगल्यास शहर वाहतूक शाखेकडून जबर दंड केला जात आहे. दरम्यान, ड्रायव्हिंग लायसनबाबत आता नवे नियम जारी करण्यात आले असून आता तुम्ही आधार कार्डशिवाय ड्रायव्हिंग लायसन काढू शकता.
सर्वच कामांसाठी आधारकार्ड महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. आधारकार्ड हरवल्यास आपल्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
तुमच्याकडे आधारकार्ड नसले तरी तुम्ही ड्रायव्हिंग लायसन बनवू शकता. याबाबतची आधीसूचना अलीकडेच जारी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर आधार व मतदार ओळख पत्राशिवाय ड्रायव्हिंग लायसन बनविणे शक्य आहे. ड्रायव्हिंग लायसन परवाना व नोंदणीसाठी तसेच ओळखपत्र, पत्ता पुरावा आणि वयाच्या पुराव्यासाठी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने एक यादीच जारी केली आहे.
आधार किंवा मतदान कार्ड नसले तरी तुम्ही ड्रायव्हिंग लायसनसाठी अर्ज करू शकता.
या यादीमध्ये रेशनकार्ड, फोटो, केंद्र अथवा राज्य सरकारी कर्मचार्‍यांचे सेवाकार्ड, पासबुक, विवाह प्रमाणपत्र आदींचा समावेश आहे. 

ही सर्व कागदपत्रे ड्रायव्हिंग लायसनसाठी वैध मानली जातील. याशिवाय कोणत्याही मान्यता प्राप्त शाळा अथवा मंडळाची दहावीची गुणपत्रिका ड्रायव्हिंग लायसन्ससाठी लागणार्‍या वयाच्या पुराव्यासाठी वैध असणार आहे. तसेच ओळखपत्रासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे. ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असतील तर तुम्ही अगदी सहजरीत्या तुमचा ड्रायव्हिंग लायसन बनवू शकता. 

Related Articles

Back to top button