महाराष्ट्र

औरंगजेब कबरीवरुन वाद! दोन गटात भयंकर राडा, जाळपोळ, जमावाकडून पोलिसांवरच दगडफेक

  • नागपूर शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून अवघ्या महाराष्ट्राचे वातावरण तापलेले आहे. अशातच नागपूर शहरातील महाल परिसरात आज रात्री 8 च्या सुमारास मोठा राडा झाला.
  • त्यात प्रामुख्याने दोन विशिष्ट समुदायाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली आहे.
  • घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. त्यांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पण जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत त्यांच्या गाड्या पेटवून दिल्या.
  • दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपुरातील महाल भागात तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण होणे दुर्दैवी आहे. नागपूरकरांनी शांतता बाळगून प्रशासनाला परिस्थिती हाताळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन गडकरी यांच्याकडून करण्यात आले आहे. 
  • नागपुरातील महाल परिसरात दगडफेक आणि तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यावर पोलिस प्रशासन परिस्थिती हाताळत आहेत. या परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपण सातत्याने पोलिस प्रशासनाशी संपर्कात असून, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे. नागपूर हे शांतताप्रिय आणि एकमेकांच्या सुखदुखा:त सहभागी होणारे शहर आहे. ही नागपूरची कायम परंपरा राहिली आहे. अशावेळी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका आणि प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करा, असे आवाहन फडणवीस यांनी केले आहे.

Related Articles

Back to top button